Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

निंबूतमध्ये गावठी हातभट्टीवर वडगाव निंबाळकर पोलिसांचा छापा; तब्बल ३.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

0 5 5 5 3 3

वडगाव निंबाळकर (बारामती):वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नींबूत गावातील ओढ्यालगत सुरू असलेल्या एका मोठ्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करून तो उद्ध्वस्त केला आहे. या छाप्यात पोलिसांनी तब्बल ३,५९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

निंबूत (ता. बारामती) येथील लक्ष्मीनगरमध्ये राहणारा प्रमोद प्रकाश नवले हा गावच्या ओढ्यालगत बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर दारू तयार करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे उघडकीस आले.

या कारवाईत पोलिसांनी एकूण ३,५९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील साहित्याचा समावेश आहे:

 * कच्चे रसायन: ३ लोखंडी बॅरल आणि जमिनीत खोदलेल्या १०×२०×३ फूट आकाराच्या खड्ड्यात साठवलेले रसायन.

 * तयार दारू: ३५ लिटर क्षमतेचे एकूण २४ कॅन (गावठी दारू).

 * साठवणूक व इतर साहित्य: २ प्लास्टिकच्या मोठ्या टाक्या, ४ विद्युत मोटर पंप आणि दारू गाळण्यासाठी लागणारे इतर साहित्य.

याप्रकरणी आरोपी प्रमोद प्रकाश नवले याच्याविरुद्ध नवीन ‘भारतीय न्याय संहिता’ आणि ‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम’ या कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

ही महत्त्वपूर्ण कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (पुणे ग्रामीण) पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रत्यक्ष कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, महिला पोलीस हवालदार शुभांगी दणाने, पोलीस अंमलदार आबा जाधव, नरेंद्र यादव, धनंजय भोसले, विकास येटाळे, महिला अंमलदार प्रियंका झणझणे आणि चालक हवालदार विजय शेंडकर यांनी सहभाग घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे