अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
बारामतीकरांची मान उंचावणारा निर्णय! स्व.अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीला राज्य शासनाचा अधिकृत बहुमान, २२ जुलै रोजी शासकीय पातळीवर साजरी होणार जयंती
0
7
8
2
6
8
मुंबई : महाराष्ट्र आणि विशेषतः बारामतीकरांसाठी आजचा दिवस अत्यंत संमिश्र भावनांचा आणि विशेष अभिमानाचा आहे. राज्याच्या राजकारणात आणि विकासात सिंहाचा वाटा उचलणारे, बारामतीचे सुपुत्र आणि राज्याचे धडाडीचे नेतृत्व स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या महान कार्याची राज्य शासनाने आता अधिकृतपणे दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज १५ जुलै २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले असून, यानुसार स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश आता शासनाच्या राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांच्या यादीत करण्यात आला आहे.

आपले लाडके नेतृत्व आज आपल्यात नाही ही बाब प्रत्येक बारामतीकराच्या आणि मराठी माणसाच्या मनाला चटका लावून जाणारी असली तरी, त्यांच्या अफाट कार्याला मिळालेला हा शासकीय सन्मान नक्कीच ऐतिहासिक आहे.

मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हेमंत महाजन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे अधिकृत परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले आहे. शासनाने सन २०२६ मध्ये साजऱ्या करावयाच्या जयंती व राष्ट्रीय दिनांच्या यादीत नव्याने हा समावेश केला आहे. या परिपत्रकानुसार, आता येत्या २२ जुलै २०२६ रोजी, बुधवारी राज्यभरात स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांची जयंती अधिकृत शासकीय कार्यक्रम म्हणून साजरी केली जाणार आहे. या दिवशी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आणि त्यांनी राज्यासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला उजाळा दिला जाईल.




