गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व नांगर २४ तासात केला हस्तगत सुपा ता.बारामती पोलीसांची कामगिरी

0
1
7
1
2
4
बारामती: शेतकरी राजेंद्र बबन खोमणे रा.आंबी बु ता. बारामती जि.पुणे यांचे मालकीचा ५,०००००/- रुपये किंचा जॉनडियर कंपनीचा ५०४५ मॉडेलचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर व ३०,०००/- रुपये कंपनीचा लाल रंगाचा नांगर दिनांक १/६/२०२५ रोजी रात्री ८:३० ते दिनांक २/६/२०२५ रोजी सकाळी ५/३० वा. दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत सुपा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. हा गुन्हा उघडकीस करण्याबाबत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसरे यांनी पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार किसन ताडगे महादेव साळुंके, व भाऊसाहेब चौधरी यांना गुन्हयाचे तपासाबाबत योग्य त्या सुचना देवुन तपास पथक रवाना केले.
या गुन्हयाबाबत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती व तांत्रिक तपास आणि सी.सी.टिव्ही फुटेज वरुन संशयीत आरोपी बाळा उर्फ अविष्कार संजय तावरे मोरगाव ता. बारामती जि.पुणे धिरज संदिप चव्हाण रा.मुर्टी ता. बारामती जि.पुणे, रोहन ज्ञानेश्वर माने रा. मोढवे ता.बारामती चेतन कानोबा दगडे रा. मोढवे ता. बारामती ओमकार रमेश पवार रा. मोरगाव ता. बारामती यांना ताब्यात घेवुन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली त्यांनी हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. हे आरोपी यांच्या कडुन गुन्हयात चोरलेला ५,०००००/- रुपये किंचा जॉनडियर कंपनिचा ५०४५ मॉडेलचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर व ३०,०००/- रुपये कंपनीचा लाल रंगाचा नांगर असा एकुण ५,३०,००० रुपये चा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.हे आरोपी सध्या पोलीस कस्टडी मध्ये असुन या गुन्हयाचा अधिकचा तपास सहा. फौजदार वसंत वाघोले हे करीत आहेत.
हि कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, श्री. संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक,श्री. गणेश बिरादार, मा.उप. विभागिय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पो.स.ई. जिनेश कोळी, पो.हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, दत्तात्रय धुमाळ, पो. कॉ. किसन ताडगे, महादेव साळुंके, भाऊसाहेब चौधरी, ऋषीकेश विर, निहाल वणवे, सुरज साळुंके, सचिन दरेकर, सागर वाघमोडे, तुषार जैनक, सचिन कोकणे, आदेश मवाळ यांनी केली आहे.