गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती तालुक्यातील पारवडी येथून १७ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

0
7
7
3
2
9
बारामती : तालुक्यातील पारवडी येथून एका अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजल शरद पुणेकर (वय १७ वर्षे १० महिने) असे या अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत मुलाचे वडील शरद दादा पुणेकर (वय ३८, व्यवसाय शेती, रा. पारवडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी १ जुलै २०२६ रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पारवडी गावातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सुजल यास कशाची तरी फुस लावून पळवून नेले आहे. सुजल याचा रंग गोरा असून, त्याने अंगात नारंगी रंगाचे जर्कीन आणि निळ्या रंगाची जीन्स पँट घातली आहे. त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल असून उजव्या कानामध्ये सोन्याची बाळी आहे. तसेच तो मराठी आणि हिंदी भाषा बोलतो.




