अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार’ स्पंदन संस्थेच्या वर्धापन दिनात गुणवंतांचा गौरव ऐतिहासिक घराण्यांच्या वंशजांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण,

0
7
7
3
9
9
पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ चे थाटात वितरण करण्यात आले. या प्रतिष्ठित सोहळ्यात दैनिक पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. मंगळवार, ७ जुलै रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वंशज शशिकांत कंक आणि सिद्धार्थ कंक, छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपा परगना प्रमुख सुनील राजेभोसले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्याही पिलाजीराव राजेशिर्के यांचे वंशज अमितराजे राजेशिर्के, सरनौबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे वंशज इंद्रजितसिंह घोरपडे तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्या दुधआई धाराऊ गाडे यांचे वंशज बाबुराजे आणि मयुर गाडे या ऐतिहासिक घराण्यातील मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याचबरोबर, माजी आमदार सुनील टिंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सातव, विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त विवेक देव, सामाजिक कार्यकर्त्या मीनाकाकी सातव पाटील, जि.प. सदस्या कोमल आव्हाळे, रोहिणी कदम-ढोले, सुरेखाताई हरगुडे, नगरसेविका रत्नमालाताई सातव, कविताताई गलांडे आणि श्वेताताई गलांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन राजकीय, वैद्यकीय, योगा, पोलीस प्रशासन, सांस्कृतिक आणि सहकार अशा विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला.




