ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसामाजिक
जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही जिल्हा परिषद सदस्य, रोहिणीताई कदम-ढोले पाटील
वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्याकडून शाळेच्या भौतिक सुविधांची पाहणी करून शालेय अडचणी सोडवण्याची ग्वाही

0
5
5
6
0
4
बारामती/वडगाव निंबाळकर: जिल्हा परिषद शाळा नंबर १ शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने आज राष्ट्रीय विज्ञान व काल मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ येथे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी दादांच्या स्मृतीस उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई संदीप कदम-ढोले पाटील, बारामती पंचायत समितीचे सदस्य श्री. जितेंद्र भगवान पवार आणि माजी सरपंच सुनीलदादा ढोले उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आदरणीय अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी व्यवस्थापन समितीतर्फे रोहिणीताई कदम-ढोले पाटील, जितेंद्र पवार आणि सुनीलदादा ढोले यांना आदरणीय अजितदादांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेच्या भौतिक सुविधांच्या मागणीसंदर्भात जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणीताई कदम-ढोले पाटील यांना एक निवेदन देण्यात आले.





