Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वडगाव निंबाळकर येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

0 8 8 2 3 9

वडगाव निंबाळकर : आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक तरुण मंडळाच्या वतीने वडगाव निंबाळकर येथे राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण होते.
जयंती उत्सवाची सुरुवात भिवडी ते वडगाव निंबाळकर अशा पायी मशाल ज्योतीने झाली. या ज्योतीचे गावात आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि राजे उमाजी नाईक व शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. महिलांनीही या मशाल ज्योतीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यानंतर संपूर्ण गावातून तरुणांची भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.

राजे उमाजी नाईक चौकात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा गुलाबपुष्प आणि छोटेखानी रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. सायंकाळच्या सत्रात तरुण मंडळाच्या वतीने पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भंडाऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सर्वांच्या सहभागामुळे हा सोहळा भव्यदिव्य वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत जाधव सर यांनी केले, तर सूर्यकांत बोडरे आणि शिवाजी खोमणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

याप्रसंगी उपसरपंच संगीता शहा, ग्रामपंचायत सदस्या सारिका खोमणे, राजू शेठ शहा, अनिल शेठ शहा, निलेश मदने, सुनिल माने, शक्ती धुमाळ, नानासाहेब मदने, महेंद्र भंडलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजे उमाजी नाईक यांच्या शौर्य, त्याग आणि क्रांतिकारी विचारांना उजाळा देत हा सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे