Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

१० वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणारा नराधम पुन्हा गजाआड! बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई,

0 6 1 9 8 1

बारामती : बारामतीत एका १० वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५२ वर्षीय विकृत नराधमाला बारामती शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. हसन शमशुध्दीन झारे उर्फ राजु असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.

आरोपी हसन झारे हा पीडित बालिकेचा शेजारी आहे. त्याने ओळखीचा फायदा घेत बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःच्या घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, त्याने यापूर्वी देखील दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे.

सदर आरोपी ३२ वर्षांचा असताना त्याने १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता.

या गुन्ह्याखाली त्याने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगली आहे.

शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही त्याच्या प्रवृत्तीत बदल झाला नाही आणि त्याने पुन्हा तशाच प्रकारचा गंभीर गुन्हा केला.

५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल होताच आरोपी घरातून पळून गेला होता. बारामती शहर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोध सुरू केला. आरोपी शहर सोडून पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी **बारामती एस.टी. स्टँड** परिसरात सापळा रचून त्याला झडप घालून अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये तपास पथकातील सुलतान डांगे, अमोल देवकाते, ऋषिकेश जाधव, राहुल बडे व गौरव ठोंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले. महिला पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

“बारामती शहर पोलीस महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेत. अशा विकृत गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ नीती अवलंबली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल.”

प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन

घटनेच्या अनुषंगाने पोलिसांकडून पालकांसाठी महत्त्वाचे आवाहन

१. मुलांना ‘Good Touch – Bad Touch’ बद्दल माहिती द्या.

२. कोणाच्याही आमिषाला बळी न पडण्याबाबत सतर्क करा.

३. अनोळखी किंवा परिचितांच्या घरी मुलांना एकटे पाठवू नका.

४. मुलांशी संवाद वाढवा जेणेकरून ते आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगू शकतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे