Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई; विवाहित असल्याचे लपवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा फरार आरोपी गजाआड

0 9 6 5 0 5

वडगाव निंबाळकर: स्वतः विवाहित असल्याचे लपवून एका अल्पवयीन मुलीला विवाहाचे खोटे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या फरार आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. गणेश रामदास मदने (रा. कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश मदने याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही, तसेच स्वतः विवाहित असल्याचे तिच्यापासून लपवून ठेवत तिला विवाहाचे खोटे आमिष दाखवले. २९ जुलै २०२४ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पणदरे येथील एका लॉजवर नेऊन त्याने पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण केले. याच दरम्यान त्याने तिचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो आणि व्हिडीओ देखील काढले.
याबाबत पीडितेने विचारणा केली असता, आरोपीने हे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या गंभीर प्रकारानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(m), ३५१(२), ३५१(३), ११५(२) तसेच पोक्सो कायदा कलम ४, ५(l), ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी पसार झाला होता.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आरोपी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी, स. फौ. महेश पन्हाळे, पोलीस हवालदार अनिल खेडकर, कल्याण खांडेकर, भागवत पाटील, सागर चौधरी, भाऊसाहेब मारकड, शशिकांत दळवी, अशोक शिंदे, संदीप गायकवाड, तसेच पोलीस शिपाई आबा जाधव, नरेंद्र यादव, सुरज धोत्रे, सचिन घाडगे, सुरज पवार, नागनाथ परगे आणि विकास येटाळे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी हे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे