Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

सोमेश्वरच्या सभासद आणि कामगारांची दिवाळी गोड! ऐतिहासिक ऊसदर आणि रक्कम खात्यावर जमा

0 9 8 8 4 0

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२०२६ गाळप हंगामासाठी राज्यातील सर्वोच्च असा ऐतिहासिक ऊसदर जाहीर करून सभासद व कामगारांची दिवाळी गोड केली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवारसाहेब आणि राज्यसभा खासदार मा. पार्थदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांच्या नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत तुटलेल्या ऊसाला प्रति मेट्रिक टन ३८०० रुपये, फेब्रुवारीतील ऊसाला ३९०० रुपये आणि मार्चमध्ये तुटलेल्या ऊसाला तब्बल ४००० रुपये असा विक्रमी दर जाहीर केला आहे. कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना ३४०० रुपये अंतिम दर देण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वीच ३३०० रुपये पहिली उचल दिली होती. आता उर्वरित ५०० रुपये प्रति टनाप्रमाणे ६०.११ कोटी रुपये आणि कार्यक्षेत्राबाहेरील शेतकर्‍यांना १०० रुपये प्रमाणे ९६ लाख रुपये थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. राजेंद्र यादव यांनी दिली.

याचबरोबर हंगाम सन २०२०-२०२१ मध्ये प्रति मेट्रिक टन २०० रुपयांप्रमाणे कपात केलेली ठेव रक्कम व त्यावरील व्याज असे २४.१५ कोटी रुपये आणि २०२३-२०२४ च्या ठेवीवरील व्याज ४.०० कोटी रुपये देखील सभासदांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

कामगारांनाही मोठा दिलासा देण्यात आला असून, त्यांना १५ टक्के बोनस ॲडव्हान्सपोटी ३.३३ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच कारखान्यातील रोजंदारी व ट्रेनी कामगारांना ८५०० रुपये प्रमाणे २९ लाख रुपयांची दिवाळी भेट, कामगारांच्या वेतनवाढीच्या फरकाचा पहिला हप्ता १.८४ कोटी रुपये आणि रजेचा पगार २८ लाख रुपये कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.

चालू गाळप हंगाम सन २०२६-२०२७ हा १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाला असून, आजअखेर ६१५२० मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. यंदा ३८५०० एकर क्षेत्रावरील ऊस लागवडीतून अंदाजे १२ ते १२.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. सोमेश्वर कारखाना सर्वोच्च ऊस दराची परंपरा कायम राखणार असून, सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस इतर कारखान्यांना देऊ नये, असे आवाहन कार्यकारी संचालक श्री. यादव यांनी यावेळी केले आहे.

 

पुरुषोत्तम जगताप यांच्या दूरदृष्टीतून सोमेश्वरचा राज्यभर नावलौकिक!

​सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून कारखान्याने राज्यभर आपली एक वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या सलग १३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कार्यकाळात कारखान्याने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले.

​या कार्यकाळातील ठळक वैशिष्ट्ये:

  • ​१३ वर्षांच्या नेतृत्वात कारखान्याला विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त.
  • ​ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा जोपासली.
  • ​कारखान्याची प्रगती, शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि कामगारांचे कल्याण यांना नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले.

​जगताप यांनी आपल्या पारदर्शक कार्यपद्धतीतून सोमेश्वरच्या नावलौकिकात मोलाची भर घातली आहे. त्यांनी निर्माण केलेला हा विश्वासाचा आणि प्रगतीचा भक्कम पाया पाहता, नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळालाही हीच गौरवशाली परंपरा पुढे कायम ठेवावी लागणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे