Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती: ‘मोक्का’ गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर बेड्या; बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई

0 7 2 9 1 2

बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का अंतर्गत गंभीर गुन्ह्यात मागील चार वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे बारामती एमआयडीसी परिसरात सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली.

​सोनू उर्फ ओंकार संजय जाधव (रा. कळंब, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी सोनू उर्फ ओंकार जाधव याच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५६३/२०२२ अन्वये गुन्हा दाखल होता. यामध्ये भारतीय दंड विधान कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), १२०(ब) (गुन्हेगारी कट रचणे), २०१ (पुरावा नष्ट करणे), १४३ (बेकायदेशीर जमाव) यांसह आर्म ऍक्ट कलम २ व २५ नुसार गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. हा गुन्हा घडल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता.

गेली चार वर्षे फरार असलेला आरोपी सोनू जाधव हा बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात येणार असल्याची अत्यंत खात्रीलायक गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग सुरू केली आणि सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी त्या ठिकाणी आला असता, पोलिसांनी अतिशय शिताफीने त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

सदरची यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली मा. पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) श्री. संदीप गिल, मा. अपर पोलीस अधीक्षक (बारामती) श्री. गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती) श्री. सुदर्शन राठोड, आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार.

ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री. कल्याण शिंगाडे, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार खारतोडे, एकसिंगे, आप्पा दराडे, पोलीस शिपाई निलेश वाकळे आणि मनोज पवार.

​या धडक कारवाईमुळे बारामती परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे