वडगांव निंबाळकर: गावातील श्रद्धास्थान असलेल्या तुकाई मंदिरात नऊ दिवस नवरात्तोउत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. दररोज नित्य पूजा आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते.
त्याच अनुषंगाने आज जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनी तिसऱ्या माळेनिमित्त मंदिराला भेट दिली, यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुलींना प्रसाद वाटप करून कुमारीकेचे पूजन केले.
यामध्ये श्री विनायक उर्फ बबन खोडके धीरन पवार, गणेश शेलार, जीवन राऊत, बाबू धुमाळ, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मुलींना राजगिरा चिक्कीचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या सर्व उपस्थित शिक्षिकांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
नियमित होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमात लोकांनी सहभागी व्हावे आणि देवीची सेवा करावी अशी आग्रही मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली.
याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते श्री विनायक उर्फ बबन खोडके, धीरन पवार, गणेश शेलार, जीवन राऊत,बाबू धुमाळ इत्यादी उपस्थित होते त्यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या मुलींना राजगिऱ्याची चिक्की वाटप करण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन च्या मुख्याध्यापिका सौ.कविता राजेंद्र जाधव सौ.विजया कृष्णा दगडे , श्रीमती,लता सतीश लोणकर,सौ.सुनिता बापू पवार,सौ.राणी लक्ष्मण ताकवले या उपस्थित होत्या.

शाळेच्या व विद्यार्थिनींच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता जाधव यांनी मंडळाचे आभार मानले.




बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा