अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
जनसेवेचा ध्यास आणि विकासाचा निर्धार! बारामती तालुक्यात शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन

0
5
3
1
8
6
वडगाव निंबाळकर / बारामती : बारामती तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. “शिवसेना” पक्ष हा केवळ सत्तेसाठी नव्हे, तर तळागाळातील सर्वसामान्यांच्या सेवेसाठी ओळखला जातो. याच विचारांचा वारसा घेऊन वडगाव-निंबाळकर जिल्हा परिषद गटातून सौ. ज्योती विकास गाडे आणि मोरगाव पंचायत समिती गणातून श्री. बाळासो मारुती बालगुडे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

बारामती तालुक्यातील जनतेने या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तळागाळात जाऊन काम करणारी ‘शिवसेना’:
शिवसेना पक्ष आणि पक्षातील पदाधिकारी केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता, १२ महिने २४ तास जनतेच्या सेवेत कार्यरत असतात. शिवसेनेने बारामती तालुक्यात एक मजबूत संघटनात्मक जाळे विणले आहे. यामध्ये ॲम्बुलन्स ड्रायव्हर, परिचारिका (नर्स), डॉक्टर्स आणि प्रत्येक जाती-धर्मातील प्रतिष्ठित व्यक्तींना जोडून घेण्यात आले आहे. यामागील मुख्य उद्देश एकच आहे की, पैशाअभावी कोणताही गोरगरीब रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये. रुग्णसेवेचे हे व्रत शिवसैनिक निष्ठेने पाळत आहेत.
जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारी टीम:
शिवसेनेच्या माध्यमातून बारामती तालुक्यात प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्र लक्ष घालून समस्या सोडवल्या जात आहेत. पक्षातील वरिष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी आपापल्या पद्धतीने कार्यरत आहेतच सोबतच
पक्षाचे तळागाळातील पदाधिकारी खालीलप्रमाणे जबाबदारी सांभाळत आहेत
* श्री.मंगेश खताळ: यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून आज पर्यंत बारामती तालुक्यातील व शेजारी इतर तालुक्यातही जवळपास साडेतीन कोटी रुपये वैद्यकीय मदत मिळवून देण्यात आले आहे.
* श्री. सुशीलकुमार अडागळे : गोरगरीब जनतेच्या पोलीस स्टेशनशी संबंधित कामांमध्ये मदत करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे.
* श्री. कृष्णमूर्ती जगताप: निराधार आणि वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळवून देणे, रेशनिंग कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी गोरगरिबांची होणारी पायपीट थांबवून त्यांना त्वरित कागदपत्रे उपलब्ध करून देणे.
* श्री. प्रवीण माकर: बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना हक्काचे लाभ मिळवून देणे.
* श्री. हनुमंतरावजी देवकाते: ग्राऊंड लेव्हलला जिथे जिथे अडचण येईल, तिथे धावून जाऊन मदत करणे.
* सौ. शशिकलाताई काळे: महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवणे.
* सौ. सुनिताताई डोंबाळे: विश्वकर्मा योजनेतून आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करणे.
* श्री. अनिल कदम: कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे.
अशा प्रकारे प्रत्येक जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन, एक भक्कम संघटना उभी केली आहे. कोणीही वंचित राहू नये आणि आलेला माणूस रिकाम्या हाताने परत जाऊ नये, या तत्त्वावर बारामतीत काम सुरू आहे.
बारामती तालुका शिवसेना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अंगीकृत असणाऱ्या सर्व संघटना एक विचाराने तालुक्यात कार्यरत आहेत.




