Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बारामती येथे शिवसेना युवा सेनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न, पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणीवर भर

0 7 3 8 3 7

बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने तसेच पूर्वेश सरनाईक व किरण साळी यांच्या मार्गदर्शनाने दिनांक २२ जून २०२६ रोजी बारामती येथे युवा सेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बारामती शहरातील हॉटेल कृष्णसागर येथे या बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

 

या आढावा बैठकीमध्ये युवा सेना लोकसभा समन्वयक मयूर जगताप यांनी उपस्थित युवा सैनिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. आगामी काळातील आव्हाने लक्षात घेता युवा सेनेची ताकद तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि संघटना वाढवण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच संघटनेच्या विस्तारासाठी आणि पक्षवाढीसाठी युवकांनी कशा प्रकारे काम केले पाहिजे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष वस्ताद पप्पू माने, पुणे जिल्हा ग्रामीण शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश खताळ आणि युवा सेना जिल्हाप्रमुख दिग्विजय जगताप तसेच राहुलजी शिवरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत असंख्य युवा सैनिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त हजेरी लावली होती.

याप्रसंगी युवासेना जिल्हा समन्वयक शुभम जामदार, युवासेना तालुका प्रमुख अमोल देवकाते आणि युवासेना शहर प्रमुख संदीप पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे परिसरातील युवा सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष वाढीसाठी सर्वजण जोमाने कामाला लागतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे