ब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न; महिलांनी बांधल्या पोलिसांना राख्या

0
8
6
9
9
9
वडगाव निंबाळकर : आज दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिसरातील महिलांनी त्यांना राख्या बांधून त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. जीवन मोहिते तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. दीपक वारुळे यांचा उपस्थित महिलांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

त्यानंतर सर्व महिलांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी बांधवांना राख्या बांधून त्यांचे विधीवत औक्षण केले.

पोलीस आणि नागरिक यांच्यातील सलोखा वाढवणाऱ्या या भावनिक प्रसंगी, पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व उपस्थित महिला भगिनींसाठी कृतज्ञता म्हणून मिठाई, चहा आणि नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधन सोहळ्याला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. जीवन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

तसेच, या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर महिलांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (बारामती तालुका) अध्यक्षा सौ. ज्योतीताई लडकत, दुध संघ संचालिका सौ. शोभा गोरख जगताप, C.R.P. तालुका कार्यकारिणी उपाध्यक्षा सौ. हेमा गणेश खोडके, तसेच सौ. मिना दशरथ जगताप, सौ. पुजा गणेश जगताप आणि सौ. राणी बजरंग जाधव यांनी सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी केला.




