अपघातअभिव्यक्तीदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
विशेष बातमी: अजित पवार विमान अपघात की घातपात? रोहित पवारांचे खळबळजनक दावे आणि तांत्रिक विश्लेषण

0
5
3
1
8
6
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हा अपघात होता की घातपात, यावर आमदार रोहित पवार यांनी एका सविस्तर सादरीकरणाद्वारे (Presentation) अनेक धक्कादायक प्रश्न उपस्थित केले आहेत. या पत्रकार परिषदेत त्यांनी विमान कंपनी, पायलटचा इतिहास आणि अपघातापूर्वीच्या संशयास्पद घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.

१. विमान कंपनी आणि मेंटेनन्सचा संशयास्पद इतिहास
रोहित पवार यांनी ‘VSR’ या विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत
* युरोपियन एजन्सीकडून बंदी: २०१० मध्ये बनलेल्या या लेअरजेट विमानाची मालक असलेल्या VSR कंपनीवर युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने (EASA) सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली होती.
* मेंटेनन्समध्ये त्रुटी: कंपनीने विमानाचा योग्य मेंटेनन्स केला नव्हता आणि अनेक तांत्रिक अहवाल मॅनिपुलेट (बदलले) केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
* इंधनाचे बेकायदेशीर कॅन: विमानात इंधनाचे जास्तीचे कॅन ठेवण्याची या कंपनीला सवय होती, जे एखाद्या ‘बाँब’सारखे घातक ठरू शकते, असा दावा रोहित पवारांनी केला.
२. मुख्य पायलटचा वादग्रस्त ट्रॅक रेकॉर्ड
अपघातावेळी विमान चालवणारे मुख्य पायलट सुमित कपूर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे:
* दारूचे व्यसन: सुमित कपूर यांना यापूर्वी दोनदा विमान उडवण्यापूर्वी दारूच्या नशेत पकडण्यात आले होते.
* बदलेले पायलट: सुरुवातीला मदन आणि यश या वैमानिकांची नावे निश्चित असताना, ऐनवेळी सुमित कपूर यांची नियुक्ती का झाली, असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला.
* कॉकपिटमधील शांतता: ट्रान्सक्रिप्टनुसार, अपघातापूर्वी को-पायलट पाठक मॅडम यांचा आवाज येत होता, मात्र मुख्य पायलट कपूर यांचा एकही शब्द रेकॉर्ड झालेला नाही.





