Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत ‘न्यायमंदिर चषक २०२६’चा थरार संपन्न; माळशिरस संघाची ऐतिहासिक झेप

0 6 2 0 6 5

बारामती: बारामती वकील संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘न्यायमंदिर चषक २०२६’ या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा समारोप नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत माळशिरस संघाने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून जेतेपदावर नाव कोरले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. व्ही.सी. बर्डे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बारामती वकील संघटनेचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे, महाड, मावळ, राजगुरुनगर, जुन्नर, कराड, सातारा, अहिल्यानगर, राहता, फलटण, वाई, दहिवडी, माळशिरस, पिंपरी-चिंचवड, दौंड आणि इंदापूर अशा महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांतून संघ दाखल झाले होते. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेत “बारामतीच्या दोन महिला क्रिकेट संघांनी”देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी युवा नेते जय पवार, युगेंद्र पवार, नगराध्यक्ष सचिनशेठ सातव यांच्यासह विविध विद्यमान नगरसेवकांनी मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

अत्यंत रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात माळशिरस संघाने बाजी मारली.

निकाल खालीलप्रमाणे आहे:

प्रथम क्रमांक: माळशिरस संघ

द्वितीय क्रमांक: बारामती ‘A’ टीम

तृतीय क्रमांक: श्रीकांत पन्हाळे XI, सातारा

चतुर्थ क्रमांक: अहिल्यानगर संघ

उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू:

 मॅन ऑफ द मॅच (फायनल): तन्मय देव (माळशिरस)

 मॅन ऑफ द सिरीज:शक्ती माने (माळशिरस)

 बेस्ट बॅट्समन:शक्ती माने (माळशिरस)

 बेस्ट बॉलर: डी.एस. माने (माळशिरस)

 बेस्ट फिल्डर:अनुराग खाडे (बारामती)

या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्युबवर करण्यात आले होते, ज्याला क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतुडे, क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष ॲड. योगेश राऊत, ॲड. समीर शेख आणि संघटनेच्या सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ वकिलांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रसाद खारतुडे यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲड. समीर शेख यांनी सांभाळले. शेवटी ॲड. योगेश राऊत यांनी सर्व सहभागी संघ आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे