अपघातआरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे शहर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई: ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहिमेत २३० तळीराम जाळ्यात येरवडा येथे विशेष समुपदेशन सत्र संपन्न; आता प्रत्येक सोमवारी होणार जनजागृती

0
5
4
4
2
6
पुणे: पुणे शहरातील वाढते अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. दिनांक १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शहरात राबविलेल्या विशेष ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ (DD) मोहिमेअंतर्गत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या तब्बल २३० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर केवळ दंड वसूल न करता, या चालकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी विशेष समुपदेशन शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

पुणे शहर वाहतूक विभागाने शहराच्या विविध भागांत ही विशेष मोहीम राबवली. यासाठी शहरातील महत्त्वाच्या ३० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. या तीन दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी केलेल्या तपासणीत २३० वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवताना आढळून आले. या सर्वांवर मोटार वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

केवळ कारवाई करून न थांबता, पोलिसांनी या चालकांसाठी ‘गांधीगिरी’ स्टाइलने समुपदेशन सत्राचे आयोजन केले होते. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ११:०० ते २:०० या वेळेत येरवडा येथील पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालयात हे शिबिर पार पडले. या शिबिरास कारवाई झालेल्यांपैकी सुमारे २०० वाहनचालक उपस्थित होते.





