Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामती नगरपालिकेच्या बेकायदेशीर ठरावाविरोधात मातंग समाजाची ऐतिहासिक बैठक; लढ्याचा निर्धार

0 7 2 4 3 7

बारामती (प्रतिनिधी): सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीतील आरक्षणाची वर्गवारी करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतरही बारामती नगरपालिकेने केलेला ‘बेकायदेशीर’ ठराव हा लोकशाहीविरोधी व सुप्रीम कोर्टाच्या अवमानासारखा असल्याचा तीव्र निषेध मातंग समाजाने केला.

बारामती शहर व तालुका मातंग समाजाच्या वतीने पाटस रोडवरील ‘इरिगेशन हॉल’ येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नगरपालिकेविरोधात कायदेशीर व सामाजिक लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत ‘एससी आरक्षणात वर्गवारी करू नये’ असा ठराव मंजूर करण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला धाब्यावर बसवणारा हा ठराव बेकायदेशीर असल्याची भूमिका समाजबांधवांनी घेतली. बैठकीत सद्यस्थितीत मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांवरही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला बारामती शहर व तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, विचारवंत व मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव उपस्थित होते. नगरपालिकेच्या लोकशाहीविरोधी भूमिकेविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रकरणी पुढील रणनीती व आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी लवकरच मोठा मेळावा आयोजित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे