Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

सुपा पोलिसांचा तत्परतेचा आदर्श : अवघ्या १२ तासांत हरवलेले सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र शोधून महिलेस परत

0 7 2 4 3 7

सुपा : (ता. बारामती, जि. पुणे) येथील पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आपल्या सजगतेचे आणि त्वरित कारवाईचे उत्कृष्ट उदाहरण देताना, हरवलेले सव्वा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र केवळ १२ तासांत शोधून ते खऱ्या मालकीणीस परत करून दिले. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी अधिक विश्वास निर्माण झाला आहे.

दिनांक १३ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता, पीडीसीसी बँक परिसरात शितल विकास टेमगिरे (रा. भरतगाव, ता. दौंड) यांचे गळ्यातील सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र (किंमत सुमारे १.५० लाख रुपये) हरवले होते. त्यांनी तातडीने सुपा पोलीस स्टेशनला मदतीची विनंती केली.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी त्वरित गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
पोलीस कॉन्स्टेबल किसनराव ताडगे, महादेव साळुंखे व भाऊसाहेब चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही तपासणी केली आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली.
तपासादरम्यान मंगळसूत्र एका महिलेला मिळून आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिला समजावून सदर दागिना ताब्यात घेऊन मूळ मालक शितल टेमगिरे यांना सुपूर्द केला.

याबद्दल शितल विकास टेमगिरे यांनी सुपा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “पोलिसांच्या या सजगतेमुळे माझे भावनिक आणि आर्थिक मोलाचे दागिने परत मिळाले. त्यांचे खूप खूप आभार.”

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसरे व त्यांच्या संपूर्ण गुन्हे शोध पथकाने साध्य केली आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन 
सुपा पोलिसांनी सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, कोणतीही मौल्यवान वस्तू हरवल्यास किंवा सापडल्यास, तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

ही बातमी सुपा पोलिसांच्या जनतेशी असलेल्या दुव्याचे आणि विश्वासार्हतेचे सकारात्मक उदाहरण म्हणून सर्वत्र प्रसारित होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे