Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सोलापूर,अकलूज पोलिसांचा मोठा दणका: आंतरराज्यीय अवैध शस्त्र तस्करी रॅकेट उद्ध्वस्त; १७ पिस्तूल, ४७ जिवंत काडतुसांसह १८.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त!

0 8 4 5 5 7

सोलापूर: सोलापूर ग्रामीणच्या अकलूज पोलिसांनी धडक कामगिरी करत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या एका मोठ्या आंतरराज्यीय बेकायदेशीर शस्त्र तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या थरारक कारवाईत पोलिसांनी तब्बल १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ६ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम पोरे यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, विकास कैलास वजाळे हा इसम टाटा नेक्सॉन कारमधून (MH 45 AE 7002) पिस्तूल विक्रीसाठी अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावरील ‘पतंगे मटण हॉटेल’जवळ येणार आहे. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ सापळा रचून विकास वजाळे याला २ पिस्तुले, ४ जिवंत काडतुसे आणि कारसह रंगेहात पकडले.

ताब्यात घेतलेल्या विकास वजाळेकडे सखोल तपास केला असता मध्य प्रदेशच्या बडवानी येथून अनिल पंचलाल मेहता हा ही शस्त्रे पुरवत असल्याचे आणि मिरजचा सराईत गुन्हेगार राहुल सतीश माने याच्या मदतीने ती सोलापूर, सांगली व कर्नाटक भागात विकली जात असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या विशेष पथकाने तात्काळ धुळे येथील सोनगीर येथे धाव घेत मुख्य सप्लायर अनिल मेहता याला पिशवीतून शस्त्रे घेऊन फिरताना शिताफीने अटक केली व त्याच्याकडून ४ पिस्तुले आणि २५ राउंड जप्त केले. त्यानंतर टेंभुर्णी परिसरातून सांगलीच्या उमदी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी राहुल सतीश माने यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ६ पिस्तुले हस्तगत करण्यात आली.

अटक आरोपी व जप्त मुद्देमाल

अटक आरोपी: १) विकास कैलास वजाळे (वय ३१, रा. परीते, माढा) २) राहुल सतीश माने (वय ३४, रा. मिरज, सांगली) ३) महादेव बाळासाहेब कोरके (वय ३०, रा. करकंब, पंढरपूर) ४) विजय सदाशिव किरणगी (वय ३४, रा. शिवणूर, बेळगाव, कर्नाटक) ५) अनिल पंचलाल मेहता (वय ३२, रा. रांजणगाव, बडवानी, मध्य प्रदेश) ६) सुमित नाना लवटे (वय १९, रा. सांगोला) (प्रदीप पांडुरंग माने व शनी भारत बनसोडे हे दोन आरोपी सध्या फरार आहेत)

जप्त शस्त्रे व साहित्य:

  • १७ देशी बनावटीची पिस्तुले (किंमत ₹१०,००,०००/-)

  • ४७ जिवंत काडतुसे (किंमत ₹४७,०००/-)

  • टाटा नेक्सॉन कार (किंमत ₹८,००,०००/-)

  • एकूण जप्त किंमत: ₹१८,४७,०००/-

न्यायालयाने सर्व ६ आरोपींना २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कारवाई करणारे पोलीस अधिकारी व पथक

ही धडक कारवाई मा. श्री. अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), मा. श्री. विजय कबाडे (अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), मा. श्रीमती प्रेरणा कट्टे (अपर पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग), आणि मा. श्री. संतोष वाळके (उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

प्रत्यक्ष तपास व कारवाई पथक:

  • पोलीस निरीक्षक निरज उबाळे (अकलूज पोलीस ठाणे)

  • सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे (तपास अधिकारी)

  • सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे

  • पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम

  • अंमलदार: पोहेकॉ श्रीराम पोरे, पोहेकॉ शिवकुमार मदभावी (फिर्यादी), पोहेकॉ राहुल रणनवरे, पोहेकॉ अमोल बकाल, पोहेकॉ समीर पठाण, पोना दत्तात्रय खरात, पोकॉ रणजित जगताप, पोकॉ तुकाराम माने देशमुख, पोकॉ विजय तवटे

  • पोलीस अधीक्षक विशेष व सायबर पथक: सपोफौ शरद कदम, पोहेकॉ सुरज हेंबाडे, पोहेकॉ अनिल शिंदे, पोहेकॉ स्वप्नील गायकवाड, पोकॉ प्रवीण मेटकरी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे