Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मोठी बातमी! महाशिवरात्री काळात ‘भीमाशंकर मंदिर’ भाविकांसाठी बंद राहणार; जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद, भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकास कामे वेगात सुरू भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांचे आवाहन

0 5 3 1 8 6

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्रीच्या कालावधीत भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात सभामंडप आणि पायऱ्यांच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली असून, मातीचे ढिगारे आणि बांधकाम साहित्य पडलेले आहे. महाशिवरात्रीला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, या ठिकाणी दुर्घटना होण्याची किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी प्रशासनाने महाशिवरात्रीच्या काळात (१२ ते १८ फेब्रुवारी) मंदिर दर्शनासाठी खुले राहील, असे सांगितले होते. मात्र, सद्यस्थितीत परिसरातील कामाचा आढावा घेतला असता, भाविकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते हे लक्षात आल्याने हा निर्णय बदलण्यात आला आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा कठोर निर्णय घेणे भाग पडले आहे. तरी सर्व भाविकांनी आणि पर्यटकांनी या कालावधीत भीमाशंकर येथे येऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे