Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती: शारदानगर महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; तरुणावर माळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल.

0 8 1 6 8 7

बारामती : तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची आणि तिला मारहाण करत धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी आर्यन मोहन कोकरे (रा. माळेगाव कारखाना, ता. बारामती, जि. पुणे) या तरुणावर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी तरुणी आणि तिची मैत्रीण लाटे-बारामती एसटीने प्रवास करून शारदानगर थांब्यावर उतरल्या होत्या. तेथून त्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाकडे पायी जात असताना आरोपी आर्यन कोकरे याने पाहुणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्वीट होमपासून त्यांचा पाठलाग सुरू केला. कॉलेजसमोरील देवीच्या मंदिराजवळ त्याने आपली स्कुटी तरुणीच्या समोर आडवी लावली आणि मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, तू गाडीवर बस असे म्हणत सक्ती केली.

तरुणीने गाडीवर बसण्यास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात तिच्या अंगातील टॉप ओढला आणि तिच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तरुणी पुढे जात असताना कॉलेजच्या गेटसमोर त्याने पुन्हा तिची वाट अडवली आणि तिचा डावा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच, तुला कोणाला सांगायचे ते सांग, तुझ्या बापाला घेऊन ये, मी तुझे लग्न होऊ देणार नाही, तू कॉलेजमध्ये जाऊ नकोस नाहीतर मी आतमध्ये येईन, अशी धमकी दिली.

या प्रकारानंतर घाबरलेली तरुणी तिच्या मैत्रिणीसह कॉलेजमध्ये गेल्यानंतर, आरोपीने तिला मोबाईलवर फोन करून तू कोठे आहेस मला सांग, नाहीतर सापडल्यावर मार खाशील अशी पुन्हा धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने स्वतः माळेगाव पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आर्यन कोकरे याच्यावर बीएनएस कलम ७४, ७८, १२६(२), ११५(२), ३५१(२), ३५१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सादिक सय्यद करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे