Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बारामती विधानसभा पोटनिवडणूक: सुनेत्राताई पवार यांच्या प्रचार सभेचा वडगाव निंबाळकरमधून जोरदार शुभारंभ.

उन्हाळ्याच्या आव्हानावर मात करत प्रचंड बहुमताने विजय मिळवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार; ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात.

0 6 2 8 9 8

वडगाव निंबाळकर : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या प्रचार सभेचा शानदार शुभारंभ वडगाव निंबाळकर येथे करण्यात आला. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या विविध मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून या प्रचार मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

या प्रचार शुभारंभासाठी वडगाव निंबाळकर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी,ग्रामस्थ आणि विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला परिसरातील अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने खालील मान्यवरांचा समावेश होता:

माजी सरपंच व प्रशासक: श्री.सुनील ढोले

माजी उपसरपंच (वडगाव निंबाळकर) सौ. संगीता शहा

पंचायत समिती सदस्य: श्री. जितेंद्र पवार

सोमेश्वर सहकारी कारखाना संचालक: शिवाजीराजे राजेनिंबाळकर

माजी सभापती (पंचायत समिती): अविनाश बाबा शिंदे देशमुख

भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष: श्री. सुनील माने

बारामती विधानसभा सोशल मीडिया प्रमुख शिवसेना पक्षाचे: श्री.सुशीलकुमार अडागळे 

सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक: श्री.अनिल कुमार शहा

माजी सरपंच व विद्यमान सदस्य: श्री. संजय साळवे

इतर प्रमुख उपस्थितीत उद्योजक मारुती नाना पानसरे, श्री. रवींद्र पवार, गजानन गुळूमकर, श्री. सत्येनराजे निंबाळकर, श्री. मधुकर शिंदे, श्री. रामचंद खंडाळे,श्री. दत्तात्रेय खोमणे, ऋषिकेश भैया शिंदे, श्री. नानासाहेब मदने,श्री. उन्मेष शिंदे आणि श्री. राजेंद्र शहा, निलेश आगम,यांच्यासह विविध सेलचे प्रमुख आणि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनासाठी बूथ प्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या सभेला खालील बूथ प्रमुखांनी विशेष उपस्थिती दर्शवली:

 * श्री. धैर्यशील राजे निंबाळकर

 * श्री. चंद्रकांत जाधव सर

 * श्री. दत्तात्रेय बनकर

 * श्री. राजेंद्र जाधव

 * श्री. विनोद दरेकर

 * श्री. सुनील खोमणे.

या शुभारंभाप्रसंगी सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नेत्यांनी ‘जास्तीत जास्त मतदान कसे करून घेता येईल’ यावर प्रमुख भर दिला.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि वाढत्या तापमानामुळे मतदारांना घरातून बाहेर काढणे आणि मतदान केंद्रापर्यंत आणणे हे कार्यकर्त्यांसमोरील एक मोठे आव्हान आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले. महायुतीच्या उमेदवार श्रीमती सुनेत्राताई पवार यांना या निवडणुकीत केवळ निवडून आणायचे नाही, तर त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे, असा ठाम निर्धार यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.

या प्रचार शुभारंभामुळे वडगाव निंबाळकर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुतीच्या गोटात विजयाचा मोठा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे