ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
अष्टविनायकातील ‘या’ तीन मंदिरांत भाविकांना महिनाभर प्रवेश बंद; जतन व संवर्धन कामासाठी मोठा निर्णय

0
6
8
3
2
2
पुणे: चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या अष्टविनायकातील महत्त्वाच्या तीन मंदिरांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील श्री गणेश मंदिरे जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामासाठी १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत मंदिरांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पुरातत्व विभागामार्फत या मंदिरांच्या मुख्य गाभाऱ्याचे आणि सभामंडपाचे मूळ पौराणिक काळाप्रमाणे सुबक दगडी बांधकाम व संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असल्याने आणि भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.




