Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

१८ महिन्यांपासून फरार असलेला ‘मोक्का’ आरोपी गजाआड; वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई

0 8 5 9 4 4

बारामती/इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील बहुचर्चित उत्तम जाधव खून प्रकरणातील फरार आरोपी आणि राजू भाले टोळीचा सदस्य सोमनाथ बबन पवार याला अखेर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या १८ महिन्यांपासून अटकेच्या भीतीने वेशांतर करून फिरत असलेल्या या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी कळंब (ता. इंदापूर) येथे सापळा रचून जेरबंद केले.

निमसाखर येथील उत्तम जाधव खून प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या गुन्ह्यात राजू भाले या बेकायदेशीर टोळीचा सहभाग निष्पन्न झाल्याने, टोळीवर कठोर अशी ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या टोळीचा सक्रिय सदस्य असलेला आरोपी सोमनाथ बबन पवार (वय ३३ वर्षे, रा. कळंब, ता. इंदापूर, जि. पुणे) हा गुन्ह्यापासून मागील दीड वर्षापासून (१८ महिने) फरार होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो सातत्याने आपली वेशभूषा बदलत होता.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी रेकॉर्डवरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वालचंदनगर पोलिसांचे पथक शोधमोहीम राबवत होते.
यादरम्यान, आरोपी सोमनाथ पवार हा गुपचूपपणे कळंब परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे तपास पथकातील अंमलदारांनी कळंब येथे वेशांतर करून सापळा रचला. आरोपी तिथे येताच पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्याने आपली ओळख मान्य केली. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याला अटक करण्यात आली.
३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी:
आरोपीला अटक केल्यानंतर शिवाजीनगर, पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात रिमांडकामी हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स्वतः पोलीस करत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती) चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, तसेच पोलीस हवालदार आप्पा दराडे, कीर्तीलाल गायकवाड, आणि पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर, राहुल माने यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे