Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकरच्या मयूर साळवे याची पुरवठा निरीक्षक पदी निवड; स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेत भव्य सत्कार

0 7 3 5 3 0

बारामती : वडगाव निंबाळकर येथील मयूर छबुराव साळवे या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोठे यश संपादन केले आहे.शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात त्याची पुरवठा निरीक्षक म्हणून निवड झाली आहे.

२०२३ च्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतून त्याने हे यश मिळवले असून त्याची नियुक्ती लातूर जिल्हा पुरवठा कार्यालयात करण्यात आली आहे.
मयूरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण गावातील स्वातंत्र्य विद्या मंदिर विद्यालयात झाले. मयूरची कौटुंबिक परिस्थिती बेताची असली तरी त्याच्या कुटुंबाने त्याला खंबीर साथ दिली. त्याची आई अंगणवाडी सेविका तर वडील रास्त भाव धान्य दुकानदार आहेत. मयूरने २०१८ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. सुरुवातीला काही वेळा अपयश आले, मात्र खचून न जाता त्याने अभ्यासात सातत्य ठेवले आणि अखेर यशाला गवसणी घातली.

नुकताच त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर या त्याच्या प्रशालेत त्याचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशालेचे प्राचार्य व जनता शिक्षण संस्थेचे ग्रामीण संचालक आदरणीय श्री. हेमंत तांबे सर यांच्या हस्ते बुके, शाल आणि श्रीफळ देऊन मयूरला गौरविण्यात आले.
या सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मयूरने शालेय जीवनातील जुने अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेमुळेच मी घडलो अशी कृतज्ञता त्याने आपल्या भावनांमधून व्यक्त केली.

या कार्यक्रमात प्राचार्य श्री. तांबे सरांनी मयूरला त्याच्या पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले. मयूर साळवे याचा हा संघर्षमय प्रवास आणि जिद्द ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक मोठी प्रेरणा ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे