Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सुपा पोलिसांची दमदार कामगिरी: टॉवर लाईनच्या ॲल्युमिनियम तारा चोरणारी टोळी गजाआड; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

0 6 5 0 9 5

सुपा: खंडूखैरेवाडी व शेरेवाडी गावच्या हद्दीतून टॉवर लाईनच्या ॲल्युमिनियम तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सुपा पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ५ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १३ लाख ४९ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहेत.

दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ ते ५ फेब्रुवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान खंडूखैरेवाडी (टॉवर क्र. १२४/० ते १२४/२) आणि शेरेवाडी (टॉवर क्र. १२०/५ ते १२०/६) येथील ए एल ५९ झेब्रा कंडक्टरची तार अज्ञातांनी चोरून नेली होती. चोरीस गेलेल्या या तारेची लांबी ५ किलोमीटर (०.६ किमी + ४.४ किमी) असून तिची एकूण किंमत १७ लाख ९९ हजार ५०० रुपये इतकी होती. याप्रकरणी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुपा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर केला आणि गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणी पोलिसांनी परराज्यातील आणि राज्यातील विविध जिल्ह्यांतील खालील ५ आरोपींना अटक केली आहे,

शिवशंकर मारुती हळदेकर (वय २३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, चाकण. मूळ रा. नांदेड)
मोहनसिंग धनसिंग राजपुत(वय ३६ वर्षे, सध्या रा. केसनंद, वाघोली. मूळ रा. राजस्थान)
सुरज राजु गिरम उर्फ सुरज डोंगरे(वय २१ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, चाकण. मूळ रा. परभणी)
कलाम अब्दुल हमीद खान (सध्या रा. कुरकुंभ. मूळ रा. उत्तर प्रदेश)अर्जन श्रीराम यादव (सध्या रा. कुरकुंभ. मूळ रा. उत्तर प्रदेश)

या आरोपींकडून चोरीस गेलेल्या मालापैकी १३ लाख ४९ हजार ८७५ रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याशिवाय गुन्हा करण्यासाठी वापरलेली महिंद्रा बोलेरो मॅक्स एक्स पिकअप (नंबर: MH 14 KA 9429) आणि पल्सर मोटरसायकल (नंबर: MH 26 DE 2185) जप्त करण्यात आली आहे.

सदर धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदिपसिंह गिल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुदर्शन राठोड, तसेच सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे आणि प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या उत्कृष्ट तपासात पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार संतोष पवार, महेंद्र गायकवाड, रुपेश साळुंखे, पोलीस अंमलदार किसन ताडगे, महादेव साळुंखे, भाऊसाहेब चौधरी आणि चालक सोमनाथ होले यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष पवार हे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे