Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सासवडमध्ये बिंगो जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोघांवर गुन्हा दाखल.

0 8 3 2 4 0

सासवड : हद्दीतील खंडोबानगर झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या बिंगो नावाच्या जुगार अड्ड्यावर सासवड पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह टीव्ही आणि जुगाराचे साहित्य जप्त केले असून, दोघांवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोपान आनंदा उबाळे (वय ३१ वर्षे, रा. हिवरकरमळा, सासवड, ता. पुरंदर) आणि किरण प्रकाश सोळंकी (रा. खंडोबानगर, झोपडपट्टी, ता. पुरंदर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रविण श्रीमंत शेंडे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या सुमारास खंडोबानगर झोपडपट्टीत एका पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक बिंगो नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन, १ ते ९ अंक असलेल्या प्लास्टिकच्या बोर्डवरील चित्रांवर पैसे लावून बिंगो जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी ४ हजार ८२० रुपयांची रोख रक्कम, १० हजार रुपये किमतीचा ३२ इंची ह्युंदाई कंपनीचा टीव्ही आणि ३० रुपये किमतीचा जुगाराचा बोर्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७५/२०२६, महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार होळकर यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून, पोलीस हवालदार शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे