बारामती: स्वातंत्र्य विद्यामंदिर वडगाव निंबाळकर प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

प्रशालेचे प्राचार्य व जनता शिक्षण संस्थेचे संचालक श्री हेमंत तांबे सर पर्यवेक्षक श्री हेमंत बगनर सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याचबरोबर प्रशालेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनीही अभिवादन केले.

प्रशालेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी ज्येष्ठ शिक्षक श्री अनिल पाटील सर व सौ गाडे मॅडम तसेच प्रशालेचे प्राचार्य हेमंत तांबे सर यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काळे सर यांनी केले .शिक्षक प्रतिनिधी श्री नाळे सर यांनी आभार मानले.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा