Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बारामतीत विविध उपक्रम; आरोग्य शिबिरासह लोकशाही विचारांचा जागर

0 6 3 8 8 6

बारामती : ‘कायकवे कैलास’ आणि ‘दासोह’ या तत्त्वज्ञानातून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि समतावादी समाजाचे स्वप्न पाहणारे महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती बारामती शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने लिंगायत समाजाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तर ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प करण्यात आला.

महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून लिंगायत समाजाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य आरोग्य शिबिर पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली,

 मुक्ताई हॉस्पिटल (डॉ. मीनल गवसणे): स्किन चेकअप. (डॉ. गवसणे यांनी १० ते २० मे दरम्यान मोफत कन्सल्टिंग करण्याचे आवाहनही केले आहे).

बारामती हॉस्पिटल: बी.पी., शुगर, ऑक्सिजन आणि ईसीजी तपासणी.

 एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे: मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू/काचबिंदू शस्त्रक्रिया आणि अल्प दरात चष्मे वाटप.

शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वेळापूर:हर्निया, अपेंडिक्स व मुतखडा तपासणी.

या शिबिराचा १०० समाज बांधवांनी लाभ घेतला. तपासणी दरम्यान ३ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि २ रुग्णांची मूळव्याध शस्त्रक्रिया मोफत करण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी व सौ. चिवडशेट्टी, नगरसेवक यशपाल पोटे, सौ.अनुप्रीता ताबे (डांगे),माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष आप्पा ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आंबेडकर स्मारक येथे पूजापाठ करून महात्मा बसवेश्वर सर्कल येथे पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष समीर ढोले, सौ. माधुरी झाडबुके, सौ. हेमा बोधे, विश्वस्त मंडळ आणि जयंती समितीचे रोहित पिल्ले,अभिषेक ढोले, विजय गाढवे, ऋषिकेश भुंजे, सचिन शाहीर, ॲड. अमित ढोले, तनिष्क ढोले यांसह बसवप्रेमी उपस्थित होते.

दुसरीकडे, ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शहाजी दळवी यांनी बसवेश्वरांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “बसवेश्वरांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांना ठाम विरोध करून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. त्यांच्या ‘अनुभव मंटप’ संकल्पनेतूनच लोकशाहीची पायाभरणी झाली आहे.”

या कार्यक्रमाला सरपंच सुप्रिया नाळे, उपसरपंच राहुल भोपळे, माजी सभापती अशोक नवले, रमेश मोरे, डॉ. मोहन नेवसे, बापूराव गवळी, अविनाश काळकुटे, मनोज नाळे, कांतीलाल काळकुटे, दिलीप चौधरी, प्रशांत जाधव, गजानन नाळे, अशोक घोरपडे, ॲड. सचिन दळवी, जावेद शेख, बाळासाहेब फडतरे, राहुल कालगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मनोज काळोखे, विनोद नवले, ॲड. पंढरीनाथ नाळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सोमनाथ भिले यांनी सूत्रसंचालन केले, तर उपसरपंच राहुल भोपळे यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे