Breaking
अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बातम्यांसाठी दबाव खपवून घेणार नाही; सुपा पोलीस ठाण्यात पत्रकारांचे धडक निवेदन!

धमकी देणाऱ्या 'त्या' कार्यकर्त्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन - पत्रकार संघाचा इशारा

0 5 9 3 8 7

सुपा : बारामती तालुक्यातील सुपा येथे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना “आमच्या मनासारख्या बातम्या का लावत नाही?” अशी विचारणा करत दमबाजी करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आज बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाने आक्रमक भूमिका घेतली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देत आज सुपा पोलीस ठाण्यात पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

सुपा गावातील काही राजकीय कार्यकर्त्यांनी पत्रकारांना गाठून बातमीदारीबाबत असभ्य भाषेत जाब विचारला आणि धमकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, आज सर्व पत्रकारांनी एकत्रित येत सुपा पोलिसांची भेट घेतली. “सत्य परिस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे दहशत माजवून पत्रकारांची मुस्कटदाबी करणे हे लोकशाहीला घातक आहे. पोलिसांनी आणि संबंधित राजकीय पक्षाच्या वरिष्ठांनी याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा पत्रकार योग्य त्या मार्गाने तीव्र आंदोलन करतील, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी पत्रकार संघाचे हेमंत गडकरी,मनोहर तावरे,जयराम सुपेकर,महेश जगताप,सुनील जाधव,सचिन पवार,सुदाम नेवसे,रमेश वाघ,सुशिलकुमार अडागळे,विजय गोलांडे,चिंतामणी क्षिरसागर,दिपक जाधव,युवराज इंदलकर,अक्षय इथापे,विनोद पवार,राहुल तावरे यांच्या सह बहुसंख्य पत्रकार बंधू उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे