Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

निर्भयाला न्याय! बारामती पोलिसांची दमदार कामगिरी; अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सश्रम कारावास

0 5 5 5 3 3

बारामती: बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणात बारामती पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पीडित महिला ‘निर्भया’ला न्याय मिळवून देण्यात पोलिसांना यश आले असून, आरोपी अण्णा सुरेश ओव्हाळ (वय ४३, रा. सरडे, ता. फलटण) याला न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि २०,००० रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे.

दिनांक १४ जून २०२४ रोजी आरोपी अण्णा ओव्हाळ याने पीडित महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर पीडितेने दाखवलेल्या धैर्यामुळे बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ४५३/२०२४, भा.द.वि. कलम ३७६(२)(r) अन्वये तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक संध्याराणी देशमुख यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि काटेकोर पद्धतीने केला. त्यांनी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि तांत्रिक बाबींचे भक्कम संकलन करून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा केले. हे सर्व पुरावे न्यायालयासमोर प्रभावीपणे सादर करण्यात आले, ज्यामुळे आरोपीला पळवाट उरली नाही.

सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. बी. डी. शेळके यांच्या न्यायालयात (सेशन केस नं. १६३/२०२४) झाली. सरकारी अभियोक्ता मा. कमलाकर एस. नवले यांनी पीडितेच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पोलिसांचा तपास ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत भा.द.वि. कलम ३७६(२)(F) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

याकामी पुढील अधिकारी व अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली:

 * सेशन कोर्ट पैरवी अंमलदार: G PSI श्री. कसपटे

 * जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी: PI श्री. संतोष घोळवे (TMC, पुणे ग्रामीण)

 * कोर्ट कर्मचारी: म. पो. शि. आवटे (६९९) आणि म. पो. हवा कोकरे (१२९६)

“महिलांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसवा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देणे ही आमची प्राथमिकता आहे. बारामती पोलिसांची ‘Zero Tolerance’ भूमिका यापुढेही कायम राहील.”

प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे