गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ४ वेगवेगळ्या वॉरंटमधील विशेष मोहिमेत ५ सराईत आरोपींना एकाच दिवशी बेड्या!
वारंवार समन्स टाळून न्यायालयाला गुंगारा देणाऱ्यांवर बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई; पोलीस हवालदार उदय टापरे व पथकाची उल्लेखनीय कामगिरी

0
8
4
3
6
8
बारामती : न्यायालयाचे वारंवार समन्स बजावूनही हजर न राहता न्यायालयीन प्रक्रियेला गुंगारा देणाऱ्या आरोपींवर बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पहाटे ५.०० वाजल्यापासून एकाच वेळी राबविलेल्या विशेष शोध मोहिमेत चार वेगवेगळ्या न्यायालयीन वॉरंटमधील तब्बल पाच आरोपींना एकाच दिवशी जेरबंद केले आहे. न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राबवलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
न्यायालयीन खटल्यांच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे ज्यांच्याविरुद्ध मा. न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते, अशा आरोपींचा शोध घेण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनचे वॉरंट अंमलदार पोलीस हवालदार उदय टापरे यांनी खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले होते. आरोपींच्या हालचालींची व वास्तव्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळताच, तपास पथकाच्या मदतीने पहाटे ५.०० वाजल्यापासून शहरात व परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने छापेमारी सुरू करण्यात आली. अवघ्या काही तासांत पोलिसांनी ५ ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे व गुन्ह्यांचा तपशील
१) भोल्या ऊर्फ किशोर बापू भिसे (रा. जगताप मळा, खंडोबानगर, बारामती)
-
प्रकरण: मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, बारामती (Sessions Case No. 102/2025).
-
कलमे: भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 61(2), 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190. गंभीर गुन्ह्यात १४ ऑगस्ट रोजी जारी झालेल्या अटक वॉरंटनुसार कारवाई.
२) सनी दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड ३) अनिकेत दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड
-
प्रकरण: मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, बारामती (RCC No. 415/2015).
-
कलमे: आर्म्स ॲक्ट (Arms Act – बेकायदेशीर शस्त्र बाळगणे). या दोघांविरुद्ध न्यायालयाने पकड वॉरंट जारी केले होते.
४) गणेश मारुती दळवी (रा. डोरलेवाडी, ता. बारामती)
-
प्रकरण: मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, बारामती (RCC No. 277/24). प्रलंबित खटल्यात पकड वॉरंट जारी करण्यात आले होते.
५) मोहसीन इकबाल बागवान (रा. कचेरी रोड, गांधी चौक, बारामती)
-
प्रकरण: मा. २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर न्यायालय (संक्षिप्त फौजदारी खटला क्र. 1218/2020).
-
कलमे: परक्राम्य लेख अधिनियम कलम १३८ (चेक बाऊन्स प्रकरण).
ताब्यात घेतलेल्या पाचही आरोपींना संबंधित न्यायालयांसमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी जेल कस्टडीमध्ये (कारागृहात) केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पथकाचे कौतुक व रिवॉर्ड घोषित
अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांनी या धाडसी व जलद कामगिरीची दखल घेऊन वॉरंट अंमलदार उदय टापरे व तपास पथकाचे विशेष कौतुक केले असून त्यांच्यासाठी रिवॉर्ड रिपोर्ट प्रस्तावित/घोषित केला आहे.
-
कारवाईत सहभागी पथक: पोलीस हवालदार उदय टापरे, पो.ह. ज्ञानदेव क्षीरसागर, पो.ह. यशवंत पवार, पो.शि. गिरीश नेवसे, पो.शि. अक्षय सिताफ आणि पो.शि. तुषार शिंदे.
पोलीस प्रशासनाचा इशारा
“न्यायालयीन वॉरंट केवळ कागदावरील आदेश नसून त्याची वेळेत अंमलबजावणी करणे ही न्यायव्यवस्थेची गरज आहे. न्यायालयीन प्रक्रियेस टाळाटाळ करणाऱ्या आणि फरार राहणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारच्या विशेष व धडक मोहिमा राबवल्या जातील.” — प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन



