ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
वडगाव निंबाळकर: स्मशानभूमीत शिरले गटारीचे सांडपाणी; दुर्गंधीमुळे अंत्यविधीला येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय
स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

0
7
0
6
5
2
वडगाव निंबाळकर:वडगाव निंबाळकर येथील स्मशानभूमीच्या परिसरात अंडरग्राउंड गटारीचा चेंबर फुटल्याने गटारीचे घाण पाणी थेट स्मशानभूमीत शिरले आहे. यामुळे स्मशानभूमी परिसरात अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली असून, संपूर्ण परिसरात भयंकर दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वडगाव निंबाळकर येथील स्मशानभूमीच्या अगदी बाजूला एक पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्याच्या कोपऱ्यातून जाणाऱ्या अंडरग्राउंड गटारीचा चेंबर अचानक फुटला आहे. चेंबर फुटल्यामुळे त्यातील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहे. दुर्दैवाने, हे वाहून जाणारे घाण पाणी स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीला असलेल्या एका छिद्रातून (होलमधून) थेट स्मशानभूमीच्या आतमध्ये शिरत आहे. परिणामी, संपूर्ण स्मशानभूमीच्या आवारात मोठ्या प्रमाणात घाण आणि चिखल साचला असून, अत्यंत उग्र आणि किळसवाणा वास सुटला आहे.




