ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
मोठी बातमी: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद; राज्य शासनाचे अधिकृत आदेश जारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती; सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

0
5
9
3
8
7
मुंबई/पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजित (दादा) पवार यांच्या दुःखद निधनानंतर रिक्त झालेल्या पालकमंत्री पदांची जबाबदारी आता त्यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज (दि. ३ फेब्रुवारी २०२६) यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित अनंतराव पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे पुणे आणि बीड या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद रिक्त झाले होते. या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.




