गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
हद्दपारीचा आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात वावरताना आरोपीस अटक, माळेगांव ता.बारामती पोलिसांची कारवाई

0
6
6
7
6
9
बारामती : अमोल संदिपान राऊत नेमणुक माळेगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुरज उर्फ माऊली सोमनाथ काशीद रा. मेडद ता. बारामती जि. पुणे हा दि.04/08/2025 रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मेडद ता बारामती येथे हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांचेकडील माळेगाव,मपोकाक 55/969/2025 पुणे दि. 12/02/2025 अन्वये 01 वर्षे कालावधीकरीता संपुर्ण पुणे जिल्हा हद्दीतून (पुणे शहर व पिंपरी चिचंवड आयुक्तालयासह) आणि सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातुन हद्दपार केलेले असताना देखील कोणत्या तरी दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने विनापरवाना वरील आदेशाचा वारंवार अवमान करून प्रतिबंधित क्षेत्रात वावरताना मिळुन आल्याने आरोपीस अटक करण्यात आली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात वावरताना आरोपी मिळून आल्याने सुरज उर्फ माउली सोमनाथ काशीद यांचेविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.






