Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणारा नराधम गजाआड; वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

1 0 0 8 2 1

बारामती : तालुक्यातील निरगुडवाडी येथे शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. सतीश मोहिते (रा. निरगुडवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा संतापजनक प्रकार घडला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने ती शाळेत ये-जा करत असताना तिला रस्त्यात अडवले आणि तिच्याकडे मैत्रीची मागणी केली. मुलीने यास नकार दिला असता, आरोपीने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने मुलीला स्वतःच्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या सततच्या शारीरिक शोषणामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच पीडितेच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सतीश मोहिते याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(m), ६५(१), ७८, ३५१(२), ३५१(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.
या गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे