गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव निंबाळकर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: घरफोडी आणि वाहन चोरीचे ४ गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

0
6
0
2
3
7
बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी संयुक्त कारवाई करत घरफोडी आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ४ गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना, पोलिसांना एका संशयित इसमाकडे विना नंबरची मोटारसायकल मिळून आली. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने आपले नाव मयूर नितीन भोसले (रा. इंदापूर) असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता, त्याने ती चोरीची असल्याची कबुली दिली.
आरोपी मयूर भोसले आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी मिळून खालील ठिकाणी चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे:
-
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन: २ गुन्हे (दुचाकी चोरी व घरफोडी).
-
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन (सातारा): १ दुचाकी चोरीचा गुन्हा.
-
लोणंद पोलीस स्टेशन (सातारा): १ दुचाकी चोरीचा गुन्हा.
आरोपींनी कऱ्हावागज, फलटण आणि लोणंद परिसरातून दुचाकी चोरून त्या ओढ्याजवळ झाडाझुडपात लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी या सर्व दुचाकी आणि घरफोडीतील मुद्देमाल असा एकूण १,६५,५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.





