ब्रेकिंगमहाराष्ट्र
महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या जाहीर

0
6
8
5
9
3
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज एकाच दिवशी चार महत्त्वपूर्ण शासन आदेश जारी करत भारतीय पोलीस सेवेतील (IPS) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या केल्या आहेत. यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

१. अप्पर पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक स्तर (अधिकारी)या श्रेणीत मोठे फेरबदल करण्यात आले असून अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नतीने नवीन पदस्थापना मिळाली आहे:
१. कृष्ण प्रकाश: अप्पर पो. महासंचालक (फोर्स वन) वरून अप्पर पो. महासंचालक (प्रशिक्षण).
२. दत्ता कराळे: वि.पो. महानिरीक्षक (नाशिक) वरून वि.पो. महानिरीक्षक (राज्य मानवी हक्क आयोग).
३. प्रवीण पवार: वि.पो. महानिरीक्षक (कोकण) वरून वि.पो. महानिरीक्षक (नाशिक).
४. लखमी गौतम: पो. सह आयुक्त (गुन्हे, मुंबई) वरून वि.पो. महानिरीक्षक (म.रा.र.पु. महामंडळ).
५. मनोज शर्मा: वि.पो. महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) वरून पो. सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था, मुंबई).
६. कुलवंत सरंगळ: वि.पो. महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) वरून पो. सह आयुक्त (प्रशासन, मुंबई).
७. महेश पाटील: अपर पो. आयुक्त (मुंबई) वरून वि.पो. महानिरीक्षक (नियोजन व समन्वय).
८. परमजीत दाहिया: अपर पो. आयुक्त (मुंबई) वरून वि.पो. महानिरीक्षक (महाराष्ट्र रेल्वे, प्रशासन).
९. सी.के.मीना: वि.पो. महानिरीक्षक (रेल्वे) वरून वि.पो. महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र).
१०. संजय बाविस्कर: वि.पो. महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) वरून वि.पो. महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र).
११. रंजन शर्मा: पो. सह आयुक्त (पुणे) वरून वि.पो. महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र).
१२. सुनील फुलारी: वि.पो. महानिरीक्षक (कोल्हापूर) वरून वि.पो. महानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण, पुणे).
१३. राजेश प्रधान: पदस्थापनेच्या प्रतीक्षेतून पो. सह आयुक्त (नवी मुंबई).
१४. निशीथ मिश्रा: पो. सह आयुक्त (पुणे) वरून वि.पो. महानिरीक्षक (नाशिक).
१५. जय कुमार: पो. सह आयुक्त (प्रशासन, मुंबई) वरून वि.पो. महानिरीक्षक (फोर्स वन).
१६. संजय येनपुरे: पो. सह आयुक्त (नवी मुंबई) वरून वि.पो. महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा).
१७. संजय जाधव: अपर पो. आयुक्त (ठाणे) वरून अपर पो. आयुक्त (ठाणे – पदोन्नतीने).
१८. दिपक साकोरे: अपर पो. आयुक्त (नवी मुंबई) वरून पोलीस सह आयुक्त (नवी मुंबई – पदोन्नतीने).
१९. पंजाबराव उगले: अपर पो. आयुक्त (पुणे) वरून वि.पो. महानिरीक्षक (पोलीस गृहनिर्माण महामंडळ).
२०. एस. टी. राठोड: अपर पो. आयुक्त (ठाणे) वरून वि.पो. महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे, पुणे).
२१. विनायक देशमुख: अपर पो. आयुक्त (ठाणे) वरून संचालक (क्रीडा व युवक सेवा).
२२. ज्योती प्रिया सिंग: पदस्थापनेच्या प्रतीक्षेतून वि.पो. महानिरीक्षक (अन्याय निवारण पृथ्वी शक्ती).
२३. अनिल कुंभारे: पो. सह आयुक्त (वाहतूक, मुंबई) वरून पो. सह आयुक्त (गुन्हे, मुंबई).
२४. सत्य नारायण चौधरी: पो. सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था, मुंबई) वरून पो. सह आयुक्त (वाहतूक, मुंबई).

२. पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) श्रेणीतील पदोन्नत्या व बदल्या (अधिकारी)
१. मोतीलाल पाटील: वि.पो. महानिरीक्षक (SRPF, मुंबई) वरून अपर पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई).
२. प्रियांका नारनवरे: अपर पो. आयुक्त (वाहतूक, मुंबई) वरून पो. उपमहानिरीक्षक (म.रा.र.पु. महामंडळ).
३. तेजस्वी सातपुते: समादेशक (SRPF गट १, पुणे) वरून अपर पोलीस आयुक्त (गुन्हे, पुणे).
४. अशोक दुधे: उपआयुक्त (राज्य गुप्तवार्ता) वरून पो. उपमहानिरीक्षक (SRPF, मुंबई).
५. दीक्षित गेडाम: पो. उपआयुक्त (बृहन्मुंबई) वरून अपर पो. आयुक्त (ठाणे).
६. कुशालचंद्र उपाध्याय: पो. उपआयुक्त (बृहन्मुंबई) वरून अपर पो. आयुक्त (बृहन्मुंबई).
७. प्रवीण मुंढे: पो. उपआयुक्त (बृहन्मुंबई) वरून अपर पो. आयुक्त (बृहन्मुंबई).
८. योगेश कुंभेजकर: पो. अधीक्षक (भंडारा) वरून पो. उपमहानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान).
९. राकेश ओला: पो. अधीक्षक (अहमदनगर) वरून पो. उपमहानिरीक्षक (अमरावती परिक्षेत्र).
१०. एम.सी.बी. माहेश्वर रेड्डी: पो. अधीक्षक (ACB, पुणे) वरून पो. उपमहानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण, पुणे).
३. पोलीस अधीक्षक व उपायुक्त स्तरावरील बदल्या (९ अधिकारी)
१. नंदकुमार ठाकूर: प्राचार्य (नानवीज) वरून उपसंचालक (पोलीस अकादमी, नाशिक).
२. व्ही. आर. पाटील: पो. अधीक्षक (गुन्हे अन्वेषण, पुणे) वरून पो. उपआयुक्त (पुणे शहर).
३. जयंत मीना: पो. अधीक्षक (ACB, मुंबई) वरून पो. उपआयुक्त (बृहन्मुंबई).
४. रोहित फरानी: पो. उपआयुक्त (पुणे शहर) वरून पो. अधीक्षक (महामार्ग सुरक्षा, नागपूर).
५. अजय बनसोडे: पो. अधीक्षक (अमरावती) वरून समादेशक (SRPF गट २, जालना).
६. प्रशांत मोहिते: पो. उपआयुक्त (नवी मुंबई) वरून पो. उपआयुक्त (छत्रपती संभाजीनगर).
७. अविनाश बारगळ: अपर पो. अधीक्षक (नाशिक ग्रामीण) वरून पो. उपआयुक्त (नागपूर शहर).
८. सागर हबन: पो. उपआयुक्त (कोल्हापूर) वरून पो. उपआयुक्त (पुणे शहर).
९. शिवानंद झा: पो. उपआयुक्त (नागपूर) वरून पो. अधीक्षक (यवतमाळ).
४. कनिष्ठ श्रेणीतील (IPS 2022) अधिकाऱ्यांची पदोन्नती (४ अधिकारी)
१. जीवन बेनीवाल: सहा. पो. अधीक्षक (जिंतूर) वरून पो. उपआयुक्त (पुणे शहर).
२. शुभम कुमार: सहा. पो. अधीक्षक (अचलपूर) वरून अपर पो. अधीक्षक (पुणे ग्रामीण).
३. सृष्टी जैन: सहा. पो. अधीक्षक (सांगोला) वरून पो. उपआयुक्त (सोलापूर शहर).
४. हर्षवर्धन: सहा. पो. अधीक्षक (पुसद) वरून अपर पो. अधीक्षक (गडचिरोली).
राज्यपालांच्या आदेशानुसार गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी हे आदेश निर्गमित केले असून, सर्व अधिकाऱ्यांना तातडीने नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या व्यापक फेरबदलांमुळे राज्याच्या पोलीस दलाची रचना आगामी काळासाठी अधिक बळकट करण्यात आली आहे.





