Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात; मुलाला जामीन मिळवून देण्यासाठी मागितली २५ हजारांची लाच

0 4 7 3 2 9

पुणे/बारामती: मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदारावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

रमेश लक्ष्मण नागटिळक (पोलीस हवालदार, ब.नं. १४५२) वय ४२, रा. टी. शारदानगर, माळेगाव, ता. बारामती असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या करंजेपूल आऊट पोस्ट येथे कार्यरत आहेत.

या प्रकरणातील ४६ वर्षीय तक्रारदार महिलेच्या मुलावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करंजेपूल आऊट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करत आहेत. आरोपी रमेश नागटिळक हे पोलीस हवालदार असून ते सध्या या गुन्ह्यात तपास अधिकारी साबळे यांना मदतनीस म्हणून काम पाहत होते.

तक्रारदार महिलेच्या मुलाला गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी मदत करणे आणि गुन्ह्याचे चार्जशीट लवकरात लवकर कोर्टात दाखल करण्यासाठी हवालदार नागटिळक यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार महिलेने यासंदर्भात १८ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता, रमेश नागटिळक यांनी तडजोडीअंती २५ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ३१ जानेवारी २०२६ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात हवालदार नागटिळक यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ आणि ७ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती असावरी शेंडगे, पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, 

असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.

* टोल फ्री क्रमांक: १०६४

* व्हॉट्सॲप क्रमांक: ९४०३७८१०६४

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे