Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

सोमेश्वर कारखाना निवडणूक : आज करंजेपूल येथे अजितदादा पवार पॅनेलची भव्य सांगता सभा; सुनेत्रा पवार, दत्तात्रेय भरणे, विजय बापू शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती

0 9 4 6 8 0

​बारामती : शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगरच्या पंचवार्षिक निवडणूक (२०२६-२०३१) प्रचाराचा आज समारोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पुरस्कृत ‘श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या प्रचाराची सांगता सभा आज, शुक्रवार (दि. ०९ ऑक्टोबर २०२६) रोजी सायंकाळी ५:०० वाजता करंजेपूल (ता. बारामती, जि. पुणे) येथील बाजारतळावर आयोजित करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण सांगता सभेला महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, राज्याचे कृषी मंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे तसेच पुरंदर-हवेलीचे आमदार मा. श्री. विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या सभेत पॅनेलच्या प्रचाराचा अधिकृत समारोप होणार असून, या सभेसाठी परिसरातील सर्व सन्माननीय सभासद, शेतकरी, कामगार आणि बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

‘कपबशी’ हे या पॅनेलचे अधिकृत निवडणूक चिन्ह असून, कपबशी या चिन्हावर शिक्का मारून ‘श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या निवडणुकीचे मतदान रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०८:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पार पडणार आहे. 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे