Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिकसोशल मिडिया

पालकांसाठी धोक्याची घंटा. फेक अकाउंट,तरुणीला त्रास, अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडियाचा गैरवापर; माळेगाव पोलिसांची कारवाई,अल्पवयीन मुलगा ताब्यात.

इन्स्टाग्रामवर फेक अकाउंटद्वारे तरुणीला अश्लील मेसेज; माळेगाव पोलिसांकडून अल्पवयीन मुलाचा शोध,

0 9 0 1 6 7

बारामती: इन्स्टाग्रामवर बनावट (फेक) अकाउंट तयार करून एका महाविद्यालयीन तरुणीला वारंवार अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा (अल्पवयीन मुलाचा) माळेगाव पोलिसांनी छडा लावला आहे. सायबर तंत्रज्ञानाचा अत्यंत कौशल्याने वापर करत पोलिसांनी या अज्ञात आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या हातातील मोबाईल आणि सोशल मीडियाच्या गैरवापराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीला एका अज्ञात व्यक्तीकडून इन्स्टाग्रामवर फेक अकाउंटवरून वारंवार अश्लील मेसेज येत होते. या त्रासाला कंटाळून तरुणीने ते अकाउंट ब्लॉक केले. मात्र, त्यानंतर आरोपीने पुन्हा दुसरे नवीन फेक अकाउंट बनवले आणि तिथून पुन्हा अश्लील मेसेज पाठवणे सुरू ठेवले. या सततच्या त्रासामुळे संबंधित तरुणीने शक्ती अभियानांतर्गत २१ ऑगस्ट २०२६ रोजी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि सायबर टीमच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला. उपलब्ध डिजिटल माहिती आणि सोशल मीडिया अकाउंट्सच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तेव्हा हा प्रकार एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने (अल्पवयीन) केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या बालकाला ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त केला आहे. कायद्यानुसार पुढील कार्यवाही सुरू असून या बालकाचे आवश्यकतेनुसार समुपदेशन देखील करण्यात आले आहे.

सध्याच्या काळात अल्पवयीन मुलांच्या हातात सहज मोबाईल आल्यामुळे सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. योग्य मार्गदर्शन आणि समजूत नसल्यामुळे अनेक मुले चुकीच्या मार्गाला लागतात. सायबर गुन्हेगारी, फेक अकाउंट बनवून इतरांना त्रास देणे, अश्लील कंटेट पाहणे किंवा शेअर करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये मुले नकळतपणे अडकत आहेत. आभासी जगातील या चुकांमुळे त्यांचे आणि इतरांचे मानसिक आरोग्य, तसेच भविष्यातील करिअर धोक्यात येत आहे. सायबर विश्वात आपण लपून राहू शकतो, हा मुलांचा गैरसमज त्यांना गुन्हेगारीकडे वळवत आहे.

यामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची

मुलांच्या हातात स्मार्ट फोन देताना पालकांनी त्यांच्या ऑनलाईन वावरावर बारीक लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मुले इंटरनेटवर काय पाहतात, कोणाशी बोलतात, कोणते ॲप्स वापरतात याची माहिती पालकांना असायला हवी. मुलांशी मोकळा संवाद साधून त्यांना सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे समजावून सांगणे आवश्यक आहे.

तसेच, मुलींना किंवा महिलांना सोशल मीडियावर असा कोणताही त्रास होत असल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ पालकांना, शिक्षकांना किंवा पोलिसांना सांगावे. अशा प्रकरणात अश्लील मेसेज, फेक अकाउंटची लिंक आणि इतर डिजिटल पुरावे नष्ट न करता सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सदरची धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, माळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ आणि पोलीस अंमलदार ज्ञानदेव सानप, विकास राखुंडे यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे