गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई: हातभट्टी दारू विक्रेत्या महिलेला अटक, थेट येरवडा कारागृहात रवानगी
BNS कलम १२३ अन्वये १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद; अजामीनपात्र गुन्हा दाखल

0
8
7
2
5
7
बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबुत (ता. बारामती) येथे हातभट्टीची गावठी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत महिलेवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली असून, तिची रवानगी थेट पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सव्वासात (१९:१५) वाजण्याच्या सुमारास निंबुत गावाच्या हद्दीत एका ओढ्याजवळ पत्र्याच्या आडोशाला गावठी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांचे पथक कारवाईसाठी पोहोचताच, पोलिसांची चाहूल लागून आरोपी महिलेने घटनास्थळावरून पोबारा केला. मात्र, पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून या महिलेला शोधून काढले व तात्काळ अटक केली. कोमल प्रमोद नवले (रा. निंबुत, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
-
गावठी हातभट्टीची दारू: २५ लिटर (अंदाजे किंमत २,५०० रुपये)
-
रोख रक्कम: २,१२० रुपये
-
एकूण जप्त मुद्देमाल: ४,७२० रुपये



