अपघातकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वडगाव निंबाळकर येथे शॉर्ट सर्किट; अडीच एकर ऊस जळून खाक, ६ लाखांचे नुकसान!
वीज बिल थकल्यास तत्परतेने वीज तोडणारे महावितरण नुकसानभरपाई देणार का? वडगाव निंबाळकरमधील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

0
8
5
0
1
5
वडगाव निंबाळकर : महावितरणच्या कारभाराचा आणि निष्काळजीपणाचा मोठा फटका वडगाव निंबाळकर येथील शेतकऱ्यांना बसला आहे. १२ फाटा परिसरातील शेती गट नंबर २३/२४ मध्ये विजेची मुख्य तार तुटून पडल्याने झालेल्या भीषण शॉर्ट सर्किटमुळे तब्बल अडीच एकर ऊस जळून खाक झाला असून, शेतकऱ्यांचे अंदाजे ६ लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर येथील सचिन सोपान साळवे, त्यांचे चुलते गौतम बाबुराव साळवे आणि महेंद्र राजाभाऊ साळवे यांनी आपल्या शेती गट नंबर २३/२४ मध्ये १४ महिन्यांचे उसाचे पीक मोठ्या कष्टाने जोपासले होते. तोडणीच्या उंबरठ्यावर असलेल्या या पिकावर दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:५० वाजण्याच्या सुमारास अचानक विजेची जिवंत तार तुटून पडली. त्यामुळे जोरदार शॉर्ट सर्किट होऊन उसाच्या शेताने क्षणात पेट घेतला. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की पाहता पाहता अडीच एकरातील उभे पीक पूर्णपणे जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच त्याच दिवशी वडगाव निंबाळकरचे तलाठी श्री. रंधवे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व नुकसानीचा सविस्तर पंचनामा केला.




