Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीतील पणदरे येथे महिलेचा राहत्या घरात निर्घृण खून; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

0 8 9 1 2 9

बारामती: बारामती तालुक्यातील पणदरे येथे एका तीस वर्षीय विवाहित महिलेचा राहत्या घरात अज्ञाताने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोक्यात हत्याराने वार करून आणि टॉवेलने गळा आवळून हा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैशाली तानाजी पवार (वय ३० वर्षे, रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वैशाली यांच्या सासू रंजना लक्ष्मण पवार (वय ५०, रा. खडकआळी, पणदरे, व्यवसाय – मजुरी) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास किंवा त्यापूर्वी ही घटना घडली. पणदरे येथील राहत्या घरातील झोपायच्या खोलीत वैशाली पवार या असताना, अज्ञात कारणावरून एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर कसल्यातरी हत्याराने गंभीर वार केले. तसेच, टॉवेलने गळा आवळून त्यांचा निर्घृण खून केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते १३ सप्टेंबर रोजी पहाटे पावणेतीन वाजेपर्यंत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) नुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ हे करत आहेत. घरात घुसून महिलेचा खून झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, माळेगाव पोलीस आरोपीचा वेगाने शोध घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे