Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अवैध धंद्यांना थारा नाही”बारामती शहर हद्दीत मटका, जुगार, अवैध दारू किंवा तंबाखूची बेकायदेशीर विक्री खपवून घेतली जाणार नाही,  पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी

बारामती पोलिसांची धडक कारवाई: दोन मटका अड्डे उद्ध्वस्त; शैक्षणिक परिसरातील तंबाखू विक्रीवरही कडक कारवाई

0 8 6 6 0 3

बारामती : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांनी एकाच दिवशी मोठी कारवाई करत दोन कल्याण मटका अड्ड्यांवर छापे टाकले. यासोबतच, एका शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

​मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली.

शहरात दोन ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी पंचांसमक्ष छापे टाकून हि कारवाई केली,

​पानगल्ली परिसरातील कारवाई: पानगल्ली येथे टाकलेल्या छाप्यात अभिजीत किशोर शिंदे (वय २७) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५६० रुपये रोख, स्लीप बुक आणि जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गु.र.नं. ३५४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​सटवाजीनगर परिसरातील कारवाई: न्यू टी हाऊस परिसरात टाकलेल्या दुसऱ्या छाप्यात चंदन अशोक खुलसे (वय २५, रा. प्रबुद्धनगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६१० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, गु.र.नं. ३५५/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

केवळ जुगारावरच न थांबता, पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या प्रवृत्तींवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. माळेगाव कॉलनी, शारदानगर येथील ‘शारदाबाई पवार महाविद्यालय’ या शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात ‘आर.जी. ट्रेडर्स’ येथे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी रविंद्र मोहनलाल गायकवाड (वय ३८) याच्यावर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने नियंत्रण कायदा (COTPA) कलम ६(ब) व २४ अन्वये (खटला रजि. नं. ०६/२०२६) कायदेशीर कारवाई करण्यात आली.

​”कायद्यापुढे सर्व समान; अवैध धंद्यांना थारा नाही”
बारामती शहर हद्दीत मटका, जुगार, अवैध दारू किंवा तंबाखूची बेकायदेशीर विक्री खपवून घेतली जाणार नाही, अशी कडक ताकीद प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली आहे. अवैध धंदा कोणाचाही असो, त्यामागे कोणाचाही प्रभाव असो, निष्पक्ष आणि कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका पोलिसांनी मांडली आहे.

नागरिकांना आवाहन

शहरात कुठेही अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी थेट ‘डायल ११२’ (Dial 112) वर संपर्क साधावा किंवा सुरक्षित अंतरावरून फोटो/व्हिडिओ पोलिसांना पाठवावेत. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे