Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

रात्री १० वाजताचा तो राग आणि पाचव्या मजल्यावरील गूढ… बारामतीत अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू!

0 8 5 3 5 5

बारामती : घरात झालेला एक किरकोळ वाद… रात्री पावणे दहाच्या सुमारास लिफ्टने वर गेलेली एक अल्पवयीन मुलगी… आणि पहाटे एका इमारतीच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तिचा मृतदेह! बारामती तालुक्यातील रुई परिसरात घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, हे केवळ रागाच्या भरात उचललेले टोकाचे पाऊल आहे की यामागे काही वेगळेच रहस्य दडले आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

२२ ऑगस्टच्या रात्री साधारण १०:०० वाजता घरात रागावल्यामुळे ही अल्पवयीन मुलगी रागाच्या भरात घरातून निघून गेली. मुलगी खाली गेली असावी या समजुतीने कुटुंबीयांनी रात्रभर तिचा शोध घेतला. अखेर पहाटे पावणेचारच्या सुमारास हताश झालेले आई-वडील बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोहोचले. नाईट राउंड अधिकारी पोहेकॉ बापू कांबळे यांनी तात्काळ कुटुंबीयांसह परिसराचा कोपरा न् कोपरा पिंजून काढला, मात्र तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. सकाळी ६:३२ वाजता कलम १३७(२) BNS अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शोधमोहीम सुरू असतानाच डायल ११२ चे कर्मचारी पोहेकॉ कृष्णा कांबळे यांना रुई हद्दीतील स्वामी समर्थ रेसिडेन्सीजवळ एक मुलगी मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले असता, समोरचे दृश्य पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली—तीच ती बेपत्ता मुलगी होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी फॉरेन्सिक व डिटेक्शन ब्रांचच्या तीन पथकांसह घटनास्थळ गाठले.

तपासादरम्यान समोर आलेले धागेदोरे अत्यंत चक्रावून टाकणारे होते

  • लिफ्टचे फुटेज: इमारतीचे सीसीटीव्ही तपासले असता, मुलगी रात्री ०९:५८ वाजता लिफ्टने थेट वरच्या मजल्याकडे जाताना स्पष्ट दिसली.

  • बंद दरवाजाचे गूढ: पाचव्या मजल्यावरील टेरेसचा दरवाजा चक्क बाहेरून बंद होता!

  • पोलिसांनी स्थानिक मुलांच्या मदतीने शिडी लावून टेरेसवर प्रवेश केला असता, तिथे मुलीची चप्पल मिळून आली.

  • गंभीर जखमा: पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे मुलीचा डावा हात, डावा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि तोंडावर गंभीर ओरखडे होते.

प्राथमिक तपासात आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवरून मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.मात्र, रागाच्या भरात तिने थेट पाचवा मजलाच का निवडला?

टेरेसचा दरवाजा बाहेरून कसा काय बंद होता?

या सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथक कसून तपास करत आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच या गूढ मृत्यूचे खरे सत्य समोर येणार आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे