Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकर पोलिसांची दमदार कामगिरी: नागरिकांचे हरवलेले तब्बल ४ लाखांचे मोबाईल शोधून केले परत!

0 6 1 1 8 9

वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारींचे निवारण करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांच्या विशेष शोध पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे तब्बल ४ लाख ५ हजार रुपये किमतीचे एकूण १३ मोबाईल राज्याच्या विविध भागांतून शोधून काढले असून, ते त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत केले आहेत. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस हवालदार अनिल खेडकर व इतर कर्मचाऱ्यांचे एक स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते. या पथकाने अत्यंत कौशल्याने तांत्रिक माहितीच्या (सायबर आणि टेक्निकल ॲनालिसिस) आधारे तपास करून हे मोबाईल हस्तगत केले.

पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल आणि त्यांचे मालक खालीलप्रमाणे आहेत

 नितीन अनिल देशमुख (रा. माळवाडी लाटे) – आयफोन ११ प्रो (₹१,१०,०००/-)

 प्रांजली ज्ञानेश्वर शिंदे (रा. मुरूम) – आयफोन १३ प्रो (₹१,०६,५००/-)

 प्रदीप ज्ञानदेव पवार (रा. निंबुत) – विवो व्ही ४० ई (₹३६,०००/-)

 रणजित सुभाष पवार (रा. वडगांव निंबाळकर) – IQOO (₹२६,०००/-)

 इंद्रसेन दीपक शिंदे (रा. वडगांव निंबाळकर) – सॅमसंग (₹२०,०००/-)

उदय तानाजी दरेकर (रा. वडगांव निंबाळकर) – विवो वाय ५१ (₹१७,०००/-)

 अशोक महादेव ठोंबरे (रा. साखरवाडी, ता. फलटण) – रिअलमी नाझो ५० आय (₹१५,०००/-)

 संगिता रंगनाथ मारणे (रा. सस्टेवाडी) – सॅमसंग ए ५१ (₹१५,०००/-)

 विजय यशवंत भापकर (रा. चौधरवाडी) – सॅमसंग वन प्लस (₹१४,०००/-)

 दत्तात्रय संताजी गाडेकर (रा. वाकी) – विवो वाय ३२ (₹१३,०००/-)

 सोमनाथ दत्तात्रय खांडेकर (रा. सस्टेवाडी) – विवो (₹११,९९९/-)

प्रशांत संभाजी भंडलकर (रा. करंजे) – रिअलमी ३ (₹१०,५००/-)

श्रीधर राजेंद्र जगताप (रा. पुणे) – विवो वी १६ (₹१०,०००/-)

सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक (पुणे विभाग) मा. श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) मा. श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती) डॉ. श्री. सुदर्शन राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

प्रत्यक्ष कारवाईमध्ये वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.नागनाथ पाटील, पोलीस हवालदार अनिल खेडकर, पोपट नाळे, हृदयनाथ देवकर आणि विलास ओमासे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने सर्व मोबाईल मालकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे