Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

स्वातंत्र्य विद्यामंदिर वडगाव निंबाळकर येथे जुन्या आठवणींना उजाळा; एसएससी 1997-98 बॅचचा स्नेहमेळावा भावपूर्ण वातावरणात संपन्न.

0 7 7 3 2 6


वडगाव निंबाळकर: शाळेच्या आठवणी या प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि कधीही न विसरता येणाऱ्या असतात. याच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि बालपणीच्या मित्रांना पुन्हा एकदा भेटण्यासाठी स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर येथील एसएससी 1997-98 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार, दिनांक 5 जुलै 2026 रोजी अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला.

तब्बल अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या 55 मित्र-मैत्रिणींच्या डोळ्यांत यावेळी जुन्या मैत्रीचा ओलावा आणि शाळेत परतल्याचा अवर्णनीय आनंद स्पष्ट दिसत होता.
या मेळाव्याचे नियोजन आणि आयोजन केदार खोडके, डॉ. वैभव मुळीक, महेश आगम, सचिन बनकर आणि सौ. प्रीतम भोसले यांनी केले होते. रविवारी सकाळी ঠিক नऊ वाजता सर्व विद्यार्थी प्रशालेत एकत्र जमले. कार्यक्रमाची सुरुवात जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक गुरुवर्य बा. ग. जगताप यांच्या अर्धपुतळ्याचे व त्यांच्या समाधीचे पूजन करून करण्यात आली. सर्वजण पुन्हा एकदा प्रशालेत एकत्र आल्यानंतर सरस्वती पूजन, राष्ट्रगीत आणि सौ. राणी बनकर, सौ. प्रीतम भोसले व सौ. धनश्री करे यांच्या सुमधुर स्वागत गीताने कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
या आनंदाच्या क्षणी ज्यांनी जीवनाला आकार दिला त्या गुरुजनांचा विसर पडून कसा चालेल? या कार्यक्रमासाठी विशेषत्वाने निमंत्रित केलेले सेवानिवृत्त शिक्षक श्री. मुळीक सर, श्री. यादव सर, श्री. ताकवले सर, श्री. जाधव सर, श्री. बोबडे सर, श्री. गिरमे सर आणि श्री. गलांडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे प्राचार्य हेमंत तांबे सर यांनी भूषवले. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित गुरुजनांचा तसेच सेवानिवृत्त शिपाई माने काका यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार केला.

सत्काराला उत्तर देताना श्री. मुळीक सर, यादव सर, ताकवले सर, बोबडे सर आणि गलांडे सर यांनी जुन्या आठवणी सांगत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस आशीर्वाद दिले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने वकील अतुल क्षीरसागर, नंदकुमार मोरे, सचिन ढोपरे, सौ. प्रीतम भोसले, सौ. राणी बनकर आणि सौ. धनश्री करे यांनी मनोगत व्यक्त करत जुने दिवस पुन्हा जगले. शाळेप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या 1997-98 च्या बॅचच्या वतीने प्रशालेला एक एचपी कंपनीचा कलर प्रिंटर आणि साऊंड स्पीकर भेट म्हणून देण्यात आला.

दरम्यान प्रशालेचा माझी विद्यार्थी सुनील यादव यांच्या सेवानिवृत्त शिक्षकांना भगवद्गीतेचे वाटप करण्यात आले 

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हेमंत तांबे सर यांनी सर्वांचे कौतुक करत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
या सुंदर आणि भावनिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाकण प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. रीना बोराटे (बनकर) यांनी अत्यंत खुमासदार शैलीत केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वैभव मुळीक यांनी केले. अधिकृत कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी प्रत्येकाने आपली नव्याने ओळख करून देत जुन्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

त्यानंतर संगीत खुर्ची, गाण्यांच्या भेंड्या आणि इतर खेळ खेळत सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला. या यशस्वी स्नेहमेळाव्यासाठी वकील अतुल क्षीरसागर, केदार खोडके, डॉ. वैभव मुळीक, सचिन बनकर, महेश आगम, योगेश शिंदे, उदय आगम आणि सौ. प्रीतम भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले. पुढच्या वर्षी पुन्हा असेच भेटूया, या आशेवर आणि एका सुंदर आठवणीसह या जिव्हाळ्याच्या स्नेहमेळाव्याची सांगता झाली.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे